🕒 1 min read
आघाडीची टू व्हीलर निर्माता कंपनी जावा (Jawa) ने नुकतीच आपली नवीन बाईक मार्केटमध्ये लाँच केली आहे. ही बाईक विविध नवीन फीचर्ससह बाजारात आणण्यात आलेली आहे. ही बाईक म्हणजेच जावा 42 बॉबर (Jawa 42 Bobber). एकूण तीन रंगामध्ये ही बाईक बाजारात उपलब्ध आहे. चला तर मग या बाईकच्या इंजिन,फिचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊया.
इंजिन
या बाईकला जावा 42 (Jawa 42) बाईक प्रमाणेच डिझाईन करण्यात आलेले असून, ही बाईक नवीन रेट्रो रोडस्टर स्टाईल मध्ये आहे. या जावाच्या नवीन बाईक मध्ये 334cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड कुल्ड इंजनसह सुसज्ज आहे. जे 30.64hp ची मॅक्झिमम पावर आणि 32.64 न्यूटन मीटर maximum टॉर्क निर्माण करते. या इंजिन सोबतच या बाईक मध्ये 6-स्पीड गिअर बॉक्स उपलब्ध आहे.
फिचर्स
या नवीन बाईक मध्ये रायडिंगसाठी ABS कॅलिब्रेशन सुधारण्यात आले आहे. तसेच या बाईक मध्ये LED लाइटिंगसह LCD डिस्प्ले आहे. त्याचबरोबर बाईकच्या मागील बाजूस एक लहान लगेज रॅक देण्यात आलेले आहे.
किंमत
या बाईकच्या कलर नुसार किमतीमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. मिस्टिक कॉपर कलरच्या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.06 लाख रुपये आहे, तर मुन स्टोन व्हाईट कलरच्या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.07 लाख रुपये आहे. त्याचबरोबर जास्पर रेड कलरच्या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.09 लाख रुपये एवढी आहे.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | “ईडी सरकारने राज्याची थट्टा चालवलीय” ; सुप्रिया सुळेंची खोचक टीका
- Amol Mitkari | “भुजबळ साहेब आपण महात्मा फुलेंचे खरे वारसदार शोभलात…”, अमोल मिटकरींनी केली छगन भुजबळांची पाठराखन
- MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत 378 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Amol Kolhe | … म्हणून अमोल कोल्हेंनी घेतली अमित शहांची भेट, चर्चांना उधाण
- Job Alert | सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
