🕒 1 min read
कऱ्हाड : राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोण बंदूक काढतयं, कोणी ‘ओके, खोके’ घोषणा दिल्यावर तुम्हाला पाहिजे का? विचारतयं, काय चाललंय काय? असा सवाल सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेत विचारला आहे. कऱ्हाड मधील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला ईडीचे सरकार संबोधत निशाणा साधला आहे.
राज्यातील सत्ता गेली त्याचं दुःख नाही, पण या ईडी सरकारने राज्याची जी थट्टा चालवली आहे. त्याने मन व्यथित होत आहे, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
शिंदे – फडणवीस सरकार किती दिवस टिकेल?-
राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार (Shinde – Fadnavis Govt) किती दिवस टिकेल याबाबत विचारण्यात आल्यावर हे सरकार किती दिवस टिकेल, हे ते देवालाचं माहीत असल्याचे सांगत त्यांनी यावर बोलणं टाळलं. मात्र, राज्यातले सगळ्या पक्षाचे आमदार आपापल्या मतदार संघात कामाला लागले आहेत. यावरून तुम्ही काय समजायचं ते समजा असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
शिक्षणमंत्र्यांचे शिक्षणाबाबतचे नेमके धोरण काय-
सर्व खासगी शाळांच्या शिक्षकांना सरकार पगार देईल. तुम्ही फी कमी करा, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Education Minister Chandrakant Patil) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देखील सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी भाष्य केले. शिक्षणमंत्र्यांचे शिक्षणाबाबतचे धोरण नेमके काय आहे. ते त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन सुप्रिया सुळेंनी केले. त्यांनी जर सर्वांचे पगार दिले तर आम्ही स्वतः त्यांचे अभिनंदन करु असंही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Kolhe | … म्हणून अमोल कोल्हेंनी घेतली अमित शहांची भेट, चर्चांना उधाण
- Job Alert | सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती
- Sushma Andhare | “सत्तांतर नंतर महाराष्ट्र कसं शांतमय झालं…”, सुषमा अंधारे यांचा राज्य सरकारला टोला
- Supriya Sule | जे.पी. नड्डा यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा पलटवार, म्हणाल्या…
- Gulabrao Patil | उद्धव ठाकरेंचा ‘हा’ विश्वासू नेता जाणार शिंदे गटात? गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
