Share

Nilesh Rane | “उद्धव ठाकरे बोगस माणूस, बाळासाहेबांची सेना रसातळाला नेली” ; भाजप नेत्याची टीका

Published On: 

मुंबई : राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब वाद आता महाराष्ट्राला नवा नाही. नाराणय राणे (Narayan Rane) असो की नितेश आणि निलेश राणे (Nilesh Rane) असो हे उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका करत असतात. शिवसेना (Shivsena) देखील त्यांच्या टिकेला उत्तर देत असते. दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे बोगस माणूस आहे. (Balasaheb Thackeray) बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी रसातळाला नेली, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. आता उरलीसुरली शिवसेना देखील उद्धव ठाकरे वाचवू शकणार नाहीत, असे निलेश राणे म्हणाले.

धनुष्यबाण चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलाच प्लॅन बी नाही, असे राणे म्हणाले. “उद्धव ठाकरे यांची सेना रसातळाला जाणार आहे. त्यांना आता कोणीही वाचवू शकत नाही. त्यांचे भविष्य ठरलेले आहे. ते उध्वस्त होणार आहेत. आज बाळासाहेबांचा पक्ष १५ आमदारांचा करण्याचे काम कोणी केले असेल तर ते उद्धव ठाकरेंनी केलं. आता १५ आमदार पण राहतील कि नाही यावर पण शंका आहे. कसलाही मास्टर प्लॅन उद्धव ठाकरे यांच्याकडे नसतो, बोगस माणूस आहे,” असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केले आहे.

विनायक राऊत यांच्या टिकेला निलेश राणे यांचे प्रत्युत्तर-

शिवसेना नेते खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या टीकेला काल निलेश राणे यांनी  प्रत्युत्तर दिल आहे.

विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना निलेश राणे म्हणाले, “कलानगरच्या सम्राटाने घरातील कोंबडी कशी चोरली?”, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच ठाकरेंची अब्रु रस्त्यावर आणायला राऊतच जबाबदार असतील, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते विनायक राऊत?-

“शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे सहा वर्षांचे होते, तर नारायण राणे हे चेंबूरच्या नाक्यावर कोंबडी कापत हेते. हा या दोघांमधील फरक आहे”, असं विनायक राऊत यांनी त्यांनी राणेंची खिल्ली उडवली होती.

“चेंबूरच्या नाक्यावर असलेल्या टॉकिजमध्ये तिकीट ब्लॅक करणं, कोंबड्यांच्या माना कापणं, म्हणून त्यांचं नाव कोबंडीचोर पडलं”, अशी घणाघाती टीका राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!