Share

देव तारी त्याला कोण मारी! सकाळी केली इमारत रिकामी अन् दुपारी कोसळली, पाहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आपल्या आजूबाजूला आपण अनेक दुर्घटना होताना पाहतो. अशीच एक दुर्घटना दहीहंडी रोजी बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगरी येथे घडली. येथे असलेली चार मजली गीतांजली इमारत अचानक कोसळल्याने धुमाकूळ उडाला. ही इमारत धोकादायक झालेली असल्याने इमारतीला पालिका आर. मध्ये विभागाने नोटीस दिली होती. मात्र, रहिवासांनी कोर्टात धाव घेतली.

बोरीवली येथे गीतांजली इमारत दुर्घटना – 

आज सकाळी गीतांजली इमारतीमधील रहिवाशांनी स्वतःहून इमारत रिकामी केली. यानंतर दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान ही इमारत अचानकपणे कोसळली. इमारत कोसळली तेव्हा कोणीही इमारतीमध्ये नव्हतं. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले.

इमारत कोसळ्यामुळे झालेल्या ढिगाऱ्याखाली कोणी नसल्याचं मुंबई पालिका प्रशासनाने सांगितलं असून हा ढिगारा लवकरच रिकामा केला जाईल, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

कोणतीही जीवितहानी न झाल्याने दिलासा –

दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करत ट्विटरवर अनेकांनी या दुर्घटनेबाबत माहिती शेअर केली आहे. तसेच आज राज्यभरात एकीकडे दहीहंडीचा उत्सव साजरा होत असतानाच दुसरीकडे ही दुर्घटना घडली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी न झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

पाहा व्हिडीओ:

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!