मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोकमध्ये सध्या राज्याच्या राजकारणातील सर्वात जास्त चिघळलेले किंवा सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या विषयांवर रोखठोक भाष्य केलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आर्यन खान ड्रग्ज केस, मंत्री नवाब मलिकांचे जावई यांच्यावरती केलेली एनसीबी कारवाई ते राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यामागे लागलेला ईडीच्या चौकशी अशा अनेक मुद्द्यांवर राऊतांनी ‘रोखठोक’ मत मांडलं आहे. त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेची ही मनमानी, मस्तवालपणा आणि विकृत तानाशाही आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत केंद्रीय तपास यंत्रणांचा हा अतिरेक खपवून घेतला जात आहे. शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत तेच घडले. आर्यन खान याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ‘ड्रग्ज’ सापडले नाही. तरीही प्रसिद्धी, पैसा आणि भाजपचा दबाव यामुळेच त्याला अटक झाली. 26 दिवस आर्यन व त्याचे मित्र तुरुंगात राहिले. पुन्हा हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मागे भारतीय जनता पक्ष टाळय़ा पिटत उभा राहिला. हे रोगट मानसिकतेचे लक्षण आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
रिया चक्रवर्तीवर अन्याय झाला तेव्हाही माध्यमं आणि राजकारणी गप्प राहिले. आर्यन खान, अनिल देशमुखांच्या बाबतीत आणि तंबाखूस ‘ड्रग’ ठरवून अटक केलेल्या नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या बाबतीतही महाराष्ट्र, सरकार आणि लोक गप्प राहिले. अशाने भाजप व केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर कृत्य करण्याचा आत्मविश्वास वाढत आहे. एकनाथ खडसे यांचे जावई तुरुंगात आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुतणे तुरुंगात आहेत. या सगळ्यांनी इतके महिने तुरुंगात राहावे व त्यांना जामीनही मिळू नये असे कोणते भयंकर गुन्हे केले आहेत? यावर आता खुली चर्चा व्हायला हवी, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्याने आरोपच नाकारले; राऊतांचं ‘रोखठोक’ भाष्य
- ‘मोदी है तो मुमकिन है, हे अशा वेळी खरं वाटतं’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांची अहमदनगर घटनेची दाखल
- ‘नारायण राणेंनी मिळालेल्या खात्यात आपला परफॉर्मन्स दाखवला नाही तर मंत्रिपद जाईल’
- केजरीवाल सरकारची मोठी घोषणा ; मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ
- कोर्टाने वानखेडेंची ‘ती’ याचिका फेटाळली, देशाला सत्य कळायला हवे- नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

