मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचा वाद काही केल्या थांबेना. नारायण राणेंनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार फटाकेबाजी केली. त्यावरुन शिवसेनाही गप्प बसण्याचे नाव घेत नाही. शिवसेना खासदार संजय राऊतांनी नारायण राणेंच्या टीकेला दादरा नगर हवेलीवरुन सडेतोड उत्तर दिलं. तर आता शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनीही राणेंनी केलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. 5 वर्षात ते त्यांचा परफॉर्मन्स दाखवतील. नारायण राणेंबद्दल मला बोलयचं नाही. त्यांना केंद्रात महत्वाचं खात मिळालं आहे. त्यांनी त्यांच्या खात्याचा आपल्या जिल्ह्यासाठी किती वापर केला?, आता सांगता येत नाही कोणाचं करिअर किती लांब असेल. केंद्रात अनेक बदल सातत्याने होत असतात. तुम्ही परफॉर्मन्स नाही दाखवला तर तुमचं खातं जाऊ शकत. मोठे मोठे मंत्री आज केंद्रीय मंत्रिपदावर नाहीत. कोणतंही मंत्रिपद हे कोकणाला मिळतं, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
तुम्ही जेव्हा पाडापाडी करता तेव्हा आपणही त्याच दिशेने जात असतो. हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे केंद्रात आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. मग त्यांच्यावर टीका झाली पाहिजे. त्यांची कारकिर्द शिल्लक आहे. तसंच महाराष्ट्र सरकारला मनमोकळेपणाने काम करुन दिलं पाहिजे. सर्वोतोपरी मदत केली पाहिजे. ते परफॉर्मन्स नाही दाखवू शकले तर महाराष्ट्राची जनताच त्यांची जागा दाखवून देईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत आहेत. ते काम बघण्याचा सर्व नागरिकांना हक्क आहे तो तुम्ही का हिरावून घेता?, असा सवाल दीपक केसरकरांनी विरोधकांना केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल सरकारची मोठी घोषणा ; मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ
- कोर्टाने वानखेडेंची ‘ती’ याचिका फेटाळली, देशाला सत्य कळायला हवे- नवाब मलिक
- समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं; मलिकांचा गंभीर आरोप
- कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी-नितेश राणे
- ‘इंधन करातून २३ लाख कोटी रूपये कमविले’; पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

