Share

कोर्टाने वानखेडेंची ‘ती’ याचिका फेटाळली, देशाला सत्य कळायला हवे- नवाब मलिक

Published On: 

मुंबई: क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढण्यात आला असल्याची चर्चा होती. त्यावरच समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, आर्यन खान केस प्रकरणाचा तपास माझ्याकडून काढून घेण्यात आला नाही. या संबंधी मीच न्यायालयात एक रिट पीटिशन दाखल केली होती आणि या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेकडून करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान यांच्या प्रकरणाचा तपास आता दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या एसआयटी कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा तपास आता एनसीबीच्या दिल्लीतील आणि मुंबईतील टीममध्ये समन्वयाने करण्यात येणार असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे. मात्र वानखेडे यांच्या स्पष्टीकरणाचे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खंडन केले आहे.

एकतर एएनआय समीर वानखेडे यांचा चुकीचा उल्लेख करत आहे किंवा समीर वानखेडे देशाची दिशाभूल करत आहे. खंडणी व भ्रष्टाचाराचा तपास सीबीआय किंवा एनआयए मार्फत करण्यात यावा, मुंबई पोलिसांकडून नव्हे अशी याचिका वानखेडे यांनी कोर्टात दाखल केली असल्याची माहिती खोटी आहे. तर न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे देशाला सत्य कळले पाहिजे. असे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.

दरम्यान समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आला आहे. दिल्लीहून आज सहा अधिकारी येणार असून प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे. दिल्लीतील एनसीबीचे अधिकारी संजय कुमार सिंग हे सुद्धा आज मुंबईत येणार आहेत. संजय सिंग हे आर्यन खान प्रकरणाचा तपास करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!