नवी-दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल सरकारने महत्वाची घोषणा केली असून आता मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले असून त्यात ते म्हणाले आहेत की,’पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्ग मिळणाऱ्या रेशनचा कालावधी देखील आणखी सहा महिने वाढवला जावा.’
Delhi CM Arvind Kejriwal writes to PM Narendra Modi, requesting him to extend the Centre's free ration scheme for six months. Delhi Government announced the extension of its own free ration scheme for 6 months, today. pic.twitter.com/fX0vohLbTD
— ANI (@ANI) November 6, 2021
यासंदर्भात केजरीवाल म्हणाले की, ‘महागाई बरीच वाढली आहे आण करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउननंतर अनेक लोक बेरोजगार झाले आहे आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना आवाहन आहे की गरिबांसाठी मोफत रेशन देण्याच्या या योजनेला सहा महिने वाढविण्यात यावे.’
दरम्यान, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे निर्माण झालेले संकट दूर करण्यासाठी करण्यात आली होती. सुरूवातीस ही योजना तीन महिन्यांसाठी होती. त्यानंतर या योजनेचा कालावधी वाढविण्यात आला. सध्या देशभरात ८० कोटी नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कोर्टाने वानखेडेंची ‘ती’ याचिका फेटाळली, देशाला सत्य कळायला हवे- नवाब मलिक
- समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं; मलिकांचा गंभीर आरोप
- कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी-नितेश राणे
- ‘इंधन करातून २३ लाख कोटी रूपये कमविले’; पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका
- आठवड्यातून एकदा नमाज अदा करणं कुणाच्या भावना कसं दुखावू शकतं-असदुद्दीन ओवैसी


