मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिचेल मार्श याची (Mitchell Marsh) कोविड-१९ आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. मार्श सुरुवातीला रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता, त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (DC vs PBKS) यांच्यात बुधवारी होणाऱ्या सामन्याबाबत संभ्रम निर्माण झाला. पण, आता मार्शची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर हा सामना वेळेवर होणार आहे.
फिजिओ पॅट्रिक फरहार्ट वगळता, टीममधील सर्व सदस्य आरटी-पीसीआर चाचणीमध्ये निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर फरहार्ट आयसोलेशनमध्ये आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले, की मिचेल मार्शची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे.
Mitchell Marsh has tested positive with CT value of 17. Will be hospitalised. One doctor, one social media and 3 hotel staff on Delhi Capitals’ duty also positive.
They will wait for more tests tomorrow before taking a call on Delhi vs Punjab Wednesday game #BreakingNews #IPL— Vikrant Gupta (@vikrantgupta73) April 18, 2022
दिल्ली आणि पंजाब यांच्यातील बुधवारच्या सामन्याला कोणताही धोका नाही. ३० वर्षीय मार्शने १६ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना खेळला होता. त्या सामन्यात मार्शने १४ धावा केल्या होत्या. बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार, आयपीएल संघातील प्रत्येक सदस्याची टीम बबलमध्ये दर पाचव्या दिवशी चाचणी केली जाते. फ्रेंचायझी त्यांच्या सदस्यांची चाचणी देखील घेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

