🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री नीतू कपूर यांचा ८ जुलैला वाढदिवस होता. यानिमित्ताने सोशल मीडियावरून अनेक कलाकारांनी नीतू कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्येच नीतू कपूर यांची सून आलिया भट्ट हिने देखील एक खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
आता आलियाने वाढदिवसानिमित्त एक खास भेटवस्तू दिली आहे. नीतू यांनी याचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. आलियाने नीतू यांच्या वाढदिवसानिमित्त पांढऱ्या रंगाचा फुलांचा गुच्छ दिला. हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत नीतू कपूर यांनी लिहिले की, “धन्यवाद आलिया”. सूनेनं दिलेलं सरप्राईज गिफ्ट पाहून नीतू कपूर भारावून गेल्या.

दरम्यान काल वाढदिवसानिमित्त आलियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोघींचा एक फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते की, ,”सर्वात सुंदर मनाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझी सासू, मैत्रीण आणि लवकरच होणाऱ्या आजीला खूप सारं प्रेम”.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
