मुंबई : शाहरुख खान सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शाहरुख खान त्याच्या बॉडी आणि फिटनेसवर खूप लक्ष देतो. आता पुन्हा एकदा शाहरुखची शर्टलेस स्टाइल पाहायला मिळाली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इंस्टाग्रामवर शाहरुखच्या एका नवीन व्यावसायिक जाहिरातीच्या व्हिडिओने गोंधळ निर्माण केला आहे, व्हिडीओ पाहून चाहते खूश आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान बाथरूममध्ये शर्टलेस दिसत आहे. शाहरुखने बॉडीवॉशचा सल्ला देताना त्याच्या फिट बॉडीची झलकही दाखवली आहे.
https://www.instagram.com/p/CfvQMQpM2cQ/
शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी शाहरुख खानच्या या जाहिरातीच्या व्हिडिओला त्याच्या शर्टलेस स्टाईलमुळे खूप लाइक आणि शेअर करत आहेत. यासोबतच व्हिडिओवर अनेक कमेंट्सही केल्या जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले की, शाहरुख नेहमीप्रमाणे तरुण दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :


