मुंबई : आलिया भट्ट आणि रणवीर कपूर यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले. नुकतीच अलियाने ‘कॉफी विथ करण’च्या ७व्या सीझनमध्ये उपस्थिती लावली. यावेळी आलियाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. आता यामध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आलियाच्या लग्नात तिचे वडील महेश भट्ट नाराज होते असा खुलासा करण जोहरने या शो मध्ये केला आहे.
लग्नाच्या चर्चेदरम्यान करण जोहरने एक मजेदार खुलासा केला की आलियाला वधूच्या गेटअपमध्ये पाहून महेश भट्ट म्हणाले, ‘लग्नाच्या दिवशी मुलीच्या बाजूने असणाऱ्यांचे चेहरा वाईट का दिसतात.’ हे ऐकल्यावर पूजा भट्ट म्हणाली, ‘बाबा असं नाही, प्रत्येकव्यक्ती भावूक झाला आहे.’ जेव्हा आलियाने हे ऐकलं तेव्हा ती वडिलांना, म्हणाली ‘बाबा हे किती वाईट आहे, तुम्ही असं म्हणालात?’
https://www.instagram.com/p/CfjMIwss_HS/
दरम्यान, या शोमध्ये रणवीर आणि आलिया या दोघांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आलियाने देखील तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले. यावेळी आलियाला लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली, “लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी काहीच करत नाही. कारण लग्नाच्या एवढ्या सगळ्या विधी झाल्यानंतर आपण थकलेले असतो”.
महत्वाच्या बातम्या :


