मुंबई : कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षानंतर वारकऱ्यांची वारी सुरू झालेली आहे. सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीची सर्वत्र चर्चा आहे. अनेक भक्त या वारीमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. यामध्ये मराठी कलाकार देखील या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्येच आता स्वप्नील जोशी देखील या वारीमध्ये सहभागी झाला आहे. वारकऱ्यांचा उत्साह, भक्तीमय वातावरण पाहून तो अगदी भारावून गेला.
वारीमध्ये सहभागी होत स्वप्नील जोशीने सांगितले की, “वारीमध्ये सहभागी होण्याची अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली.” त्याचबरोबर वारकऱ्यांच्या पाया पडत स्वप्निलने त्यांचे आशिर्वाद घेतले. डोक्यावर वारकरी टोपी, सदरा असा स्वप्निलचा लूक पाहायला मिळत आहे.
सध्या स्वप्नील जोशीचे आषाढी वारीमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते स्वप्नीलचे कौतुक करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


