Share

Sanjay Raut : “हिंमत असेल तर शिवसेना सोडल्याचं…”, संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी खोचक टीका केली आहे. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरेंवरील टीका खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

हा सर्व प्रकार लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून हे त्यांचे डावपेच आहेत. ते शिवसेनेत नाहीत. त्यांनी विधिमंडळात शिवसेनेचा गट स्थापन केला आहे.तन-मन आणि धनाने कधीच ते भाजपमध्ये विलीन झालेत त्यामुळे हिंमत असेल तर शिवसेना सोडल्याचं जाहीर कराच. असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुढे संजय राऊत म्हणाले कि, ” तुम्ही शिवसेना सोडली असे म्हटले तर तुमची आमदारकी जाईल. तुम्हाला कोर्टात जाण्याची गरज नाही. मी शिवसेना सोडली असं बोलून दाखवा किंवा राजीनामा द्या आणि परत निवडणूक लढवा. मग हवं ते बोला”,  दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी  केली असून याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!