🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. तसेच नेत्यांकडून विविध विकासकामांचे उद्घाटन सुरु आहे.
केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे विविध शासकीय योजनेचा मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना दानवे यांनी गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी एक कामगार संघटना स्थापना करणार आहे. तिचे नाव गरीब, श्रमिक, कामगार मंडळ असे आहे. तसेच हे सरकार गरिबांचे सरकार आहे असं विधान त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी रावसाहेब दानवे, निर्मला रावसाहेब दानवे आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे हे उपस्थित होते. या नेत्यांच्या हस्ते भोकरदन तालुक्यातील लाभार्थ्यांना राशन कार्ड वितरण, धनादेश यांसह विविध शासकीय योजनेतील लाभ धारकांना वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संतोष दानवे यांनी विविध विकास कामांची माहिती दिली.
दरम्यान, रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी कॉंग्रेसच्या विलास औताडे यांचा पराभव केला होता. दानवे हे २०१४ ते २०१९ च्या दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्षही त्यांच्या कार्यकाळात भाजपने चांगले काम केले आहे.
- मतांच्या बेरजेशिवाय भाजप दुसरं काही करत नाही – जयंत पाटील
- ‘पवारांनी काय केलं, तर जनतेला स्वाभिमानाने उभं राहायला शिकवलं’
- राजेश टोपेंनी पाच वर्षांत काय दिवे लावले- हिकमत उढाण


