Share

राजेश टोपेंनी पाच वर्षांत काय दिवे लावले- हिकमत उढाण

Published On: 

औरंगाबाद: राजेश टोपे १९९९ पासून चार वेळा निवडुन आले. आघाडीच्या काळात मंत्रीपदही त्यांना मिळाले.पण इथला पायाभूत आणि मुलभूत विकास त्यांनी केला नसल्याचा आरोप शिवसेना घनसावंगी मतदारसंघातून इच्छुक असलेले डॉ. हिकमत उढाण यांनी केला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. उढाण हे राजेश टोपे यांच्या विरोधात उभे ठाकणार आहे. यामूळे ते सारा मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

डॉ. उढाण पुढे बोलताना म्हणाले,टोपेंच्या मतदारसंघात आजही रस्ते,पाणी,वीज शिक्षणाच्या सुविधा हे प्रश्न कायम आहे. मग २०  वर्षे आमदार होऊन त्यांनी काय केले.असा प्रश्नही उपस्थित केला.ते जनतेची दिशाभूल करीत विजयी होत राहील्याचे मला लोक सांगत आहेत. मी सध्या गावागावात फिरतांना लोक माझ्याकडे नाराजी व्यक्त करीत आहेत.मतदरांचा संताप वाढला आहे.त्यामूळे मला अनुकुल वातावरण आहे. लोकांना कळुन चुकले आहे की, टोपे यांना परत निवडुन दिल्यास विकास होणार नाही. त्यामूळे घनसावंगी मतदारसंघात बदल घडणार आहे. हा बदल ईतिहास घडत टोपेची सत्ता संपणार असल्याचेही उढाणा यांनी सांगितले.

दरम्यान घनसावंगी मतदारसंघात राजेश टोपेंचे एक हाती वर्चस्व आहे. दहा वर्षे कॅबीनेट मंत्रीपदाची जबाबदारी संभाळलेल्या टोपेंना मतदारसंघावर मोठी पकड आहे. यासह दोन साखर करखाने,शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. यातच मोदी लाट असतानाही टोपे यांनी घनसावंगी बालेकिल्ला शाबूत ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजय मिळवून दिला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!