Share

मतांच्या बेरजेशिवाय भाजप दुसरं काही करत नाही – जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.

महाजनादेश यात्रा ही तिरोडा येथे आली असता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभेला संबोधित  केले. यावेळी बोलताना त्यांनी मतांच्या बेरजेशिवाय भाजपा इतर काहीच करत नाही असा आरोप केला आहे. तिरोड्याला आलेल्या प्रकल्पात साडेतीन हजार लोकं काम करतात. तर भेल प्रकल्प आपल्याकडे आला असता तर यात अजून वाढ झाली असती. धापेवाडासारख्या प्रकल्पाची ९५० कोटीची मान्यता प्रफुल भाईंच्या प्रयत्नातून पुर्ण झाली आहे असेही म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी भंडारा-गोंदियात जास्तीत जास्त कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणायच ध्येय आपण बाळगले पाहिजे असं आवाहन उपस्थितांना केले आहे. याच सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी विदर्भाला विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात केले आहे. असं विधान केले आहे.

दरम्यान, या सभेला अमोल कोल्हे, जयंत पाटील, मेहबूब शेख, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर, प्रफुल्ल पटेल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!