मुंबई : आज दुपारी २ वाजता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत पत्रकारांशी संवाद साधला. तसेच त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी शिवसेना कोणाची?, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं?, याबाबत देखील उद्धव ठाकरे यांनी आज भाष्य केलं. कायद्यानुसार शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले कि, मी घटनातज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतो आहे. चिन्हाबाबतची चिंता सोडा. लोक धनुष्यबाणचं नव्हे तर उमेदवारही पाहतात. शिवसेना काही अशी गोष्ट नाहीये की कुणीतरी घेऊन पळत सुटला. कुणी चोरून नेऊ शकेल अशी शिवसेना नाही. विधिमंडळ पक्ष किंवा रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरत असतो. मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी निवडून जात असतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
समजा की कधीकाळी एखादा आमदार पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपतो का? सगळे आमदार जरी गेले, तरी पक्ष संपू शकत नाही. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही. तसेच अनेक फोटो येत आहेत की एवढे नगरसेवक गेले तेवढे नगरसेवक गेले पण असं नाहीये. कारण सध्या महापालिका अस्तित्वात नाहीत. त्यामुळं म्हटलं तर हे त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असतील, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला.
महत्वाच्या बातम्या


