मुंबई:राज्यात अनेक मोठ्या घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली असून त्यावरही ११ जुलैला न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी ठाकरे-शिंदे यांना एकत्र करण्यासाठी नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मध्यस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
“शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे.आदरणीय उद्धव साहेब व शिंदेसाहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून नरेंद्र मोदी साहेबांनी मध्यस्थी करावी, मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे.”, अशा आशयाचे ट्वीट दिपाली सय्यद यांनी केले आहे.
शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे.आदरणीय उद्धव साहेब व शिंदेसाहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून मा. नरेंद्र मोदी साहेबांनी मध्यस्थी करावी, मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे.
— Deepali Sayed (@deepalisayed) July 7, 2022
दरम्यान लवकरच शिंदे गट शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावरही दावा करणार असल्याची महिती समोर येत आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट इशारा देत धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही वेगळा करू शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच पन्नास आमदार जरी सोडून गेले तरी शिवसेना संपणारा पक्ष नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Shambhuraje Desai : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर थेट शंभूराजे देसाईंनी केला पलटवार, म्हणाले…
- Narendra Modi : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींचे ट्वीट; म्हणाले…
- Wimbledon 2022 : राफेल नदालची सेमीफायनलमधून माघार; वाचा नक्की झालं काय?
- T20 Blast 2022 : भारीच की..! अचानक मैदानात आली कार; खेळाडूही झाले अवाक्! पाहा VIDEO
- Nana Patole | काँग्रेस महाविकास आघाडी सोबतच राहिल – नाना पटोले


