🕒 1 min read
चंद्रपूर : चोरट्यांनी थेट खासदारांच्या बंगल्यात घरफोडी केली. पण त्यांना तिथे काहीही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने बंगल्यातील सामानाची तोडफोड करत चोरट्यांनी आपला संताप व्यक्त केला. या तिन्ही चोरट्यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे.
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा सरकारनगर इथे सुर्यकिरण नावाचा बंगला आहे. निवासासाठी खासदार धानोरकर याचा वापर करतात. मंगळवारी ते मुक्कामी नव्हते. ते रात्री वरोऱ्याला निघून गेले. यावेळी चोरट्यांनी बंगला फोडला असल्याची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी मिळाली. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी बंगल्याचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आता प्रवेश केला होता. तसेच बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले. पण याठिकाणी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे संतापलेल्या चोरट्यांनी बंगल्यातील सामानाची नासधूस केली, कपाट फोडले. ही तक्रार चौकीदाराने रामनगर पोलिसांत दाखल केली.
खासदारांचा बंगला चोरट्यांनी फोडल्याने पोलीस यंत्रणाही हादरली. त्यांनी बंगाल्यातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तिघे कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसले. पोलिसांनी चोवीस तासांच्या आता या तिघांना अटक केली. रोहीत इमलकर (वय २४, रा. दुर्गापूर), शंकर नेवारे (वय २०, रा. दुर्गापूर), तन्वीर बेग (वय २०, भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. मागील काही दिवसांपासून चोरटे खासदारांच्या बंगाल्याची रेकी करीत होते. त्यांनी खासदार येतात कधी. मुक्कामी कधी असतात, याची खडानखडी माहिती होती. त्यामुळेच खासदार नसताना त्यांनी बंगाल्यात कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचे धारिष्ट केले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
