Share

T20 World Cup | टीम इंडियाच्या विजयासाठी ‘या’ खेळाडूंना करावी लागणार अप्रतिम कामगिरी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आज 10 नोव्हेंबर 2022 रोजी टी 20 विश्वचषक (T20 World Cup) सामन्याच्या उपांत्य फेरी (Semi Final) मध्ये भारताची (India) टक्कर इंग्लंड (England) सोबत होणार आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान (Pakisthan) आणि न्यूझीलंड (Newzealand) यांच्यामध्ये झाला असून पाकिस्तान हा सामना जिंकून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. तर, आता 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानचा सामना उपांत्य फेरीतील दुसऱ्या विजेत्याशी होईल. त्याआधी आज ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांचा दुसरा उपांत्य फेरीतील सामना रंगणार आहे.

आज या विश्वचषक सामन्यांमध्ये भारतासमोर मोठे आव्हान आहे. कारण आजचा सामना जिंकल्यावर भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळू शकतो. त्यामुळे या सामन्यांमध्ये भारताला अष्टपैलू कामगिरी लागणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि के.ल. राहुल यांच्यावर आहे. तर दुसरीकडे विराट कोहली आपल्या दमदार परफॉर्मन्स ने हा सामना पुढे नेईल.

टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये भारतीय संघ

टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या आजच्या उपाधी फेरीमध्ये भारतीय संघाकडून केएल राहुल, रोहित शर्मा (क), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग हे खेळाडू खेळणार आहेत.

टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंड संघ

टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या आजच्या उपाधी फेरीमध्ये इंग्लंड संघाकडून अॅलेक्स हेल्स, जोस बटलर (c&wk), बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड/डेव्हिड विली हे खेळाडू खेळणार आहे.

आज भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना भारतीय वेळेप्रमाणे दुपारी 1.30 वाजता खेळला जाणार आहे. दरम्यान सामन्याच्या तीस मिनिटे अगोदर नाणेफेक होईल. दरम्यान ही नाणेफेक जो संघ गमावेल तो संघ हा सामना जिंकेल असे समीकरण गेले 11 आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यादरम्यान मैदानावर दिसले आहे. या मैदानावर भारतीय संघाने 2 टी 20 सामने खेळले आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने नाबाद 90 आणि नाबाद 64 धावा केल्या होत्या. तर, भारताने हे दोन्ही सामने नाणेफेक गमावून जिंकले होते. दुसरीकडे इंग्लंडने या मैदानावर 2011 मध्ये टी 20 सामना खेळला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!