Share

IND vs ENG T20 WC | अ‍ॅडलेडवर टॉस ठरणार निर्णायक! इतिहास काय सांगतो?

Published On: 

IND vs ENG T20 WC | आज भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे. यातील विजेता थेट पाकिस्तान संघाशी भिडणार. टीम इंडीयाने आज विजयाची नोंद केली तर 2007 नंतर प्रथमच टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना चाहत्यांना पाहायला मिळेल. भारताने 2007 मध्ये पाकिस्तानला हरवून पहिला T20 विश्वचषक जिंकला होता. दरम्यान अ‍ॅडलेड मैदानावर टॉस निर्णायक ठरणार आहे.

अ‍ॅडलेडमध्ये आतापर्यंत एकूण 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अधिक सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी विजयाची टक्केवारी कमी आहे. एकूण सात सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला चार सामन्यांत विजय मिळाला आहे.

टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी आज अॅडलेडच्या मैदानावर उतरणार आहे. दोन्ही संघ यापूर्वी एकदा T20 विश्वचषक विजेते ठरले आहेत. आयसीसी क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आणि इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 1 वाजता टॉस होईल.

दोन्ही संघाचे संभाव्य खेळाडू –

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, दीपक हुडा, हर्षल पटेल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल

इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), बेन स्टोक्स, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, डेव्हिड मलान, सॅम कुरन, मार्क वुड, मोईन अली, आदिल रशीद, टायमल मिल्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!