Share

IND vs ENG T20 WC | इंग्लंडने टॉस जिंकला, भारत करणार प्रथम फलंदाजी

Published On: 

IND vs ENG T20 WC | आज भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे. यातील विजेता थेट पाकिस्तान संघाशी भिडणार. टीम इंडीयाने आज विजयाची नोंद केली तर 2007 नंतर प्रथमच टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना चाहत्यांना पाहायला मिळेल. भारताने 2007 मध्ये पाकिस्तानला हरवून पहिला T20 विश्वचषक जिंकला होता. दरम्यान अ‍ॅडलेड मैदानावर टॉस निर्णायक ठरणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी आज अॅडलेडच्या मैदानावर उतरणार आहे. दोन्ही संघ यापूर्वी एकदा T20 विश्वचषक विजेते ठरले आहेत. आयसीसी क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आणि इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल.

अ‍ॅडलेडमध्ये आतापर्यंत एकूण 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अधिक सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी विजयाची टक्केवारी कमी आहे. एकूण सात सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला चार सामन्यांत विजय मिळाला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारताचा खेळ-11: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

इंग्लंड प्लेइंग-11: जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!