Sanjay Raut | नवी दिल्ली : संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. आज ते अनेक राजकीय भेटीगाठी करणार आहेत. अशातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं कौतुक केलं असून ते दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shaha) यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
तुरुंगात असताना संजय राऊतांचा दिनक्रम समोर आला होता. यामध्ये ते रोज वृत्तपत्र वाचतात, लिखाण करतात, अशा गोष्टी समोर आल्या होत्या. अशातच जेलमध्ये असतांना मी पेपर वाचायचो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषतः गरीबांना घर देण्यासंदर्भात आणि ‘म्हाडा’ला अधिकार देण्यासंदर्भात फडणवीस यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. यावेळी सध्या राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवतात, असं संजय राऊत म्हणाले.
आपल्यासोबत काय घडलं, हे सांगण्यासाठी आपण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं देखील संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ज्या ज्या लोकांनी हा कट रचला होता. जर त्यांना आनंद झाला असेल तर त्यांच्या आनंदात मी सहभागी आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. तसेच संजय राऊत यांना अटक करण्याचा आदेश दिल्लीवरुन आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
दरम्यान, माझी तब्येत जर बरोबर असती तर मी राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी झालो असतो. त्यांच्या यात्रेचा स्वागत आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Ponkshe | “सत्ता गेली म्हणून…”, शिंदे गटातील अभिनेते शरद पोंक्षें राष्ट्रवादीवर कडाडले
- T20 World Cup | भारत-इंग्लंड उपांत्य फेरी दरम्यान पावसाची शक्यता?
- IND vs ENG T20 WC | करो या मरो! भारताचा आज इंग्रजांशी मुकाबला, रंगणार सेमीफायनलचा थरार
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या राजकीय भेटीगाठी! शरद पवारांची घेणार भेट
- Drinking Water Rules | पाणी किती, कोणतं, कसं आणि केव्हा प्यायचं? जाणून घ्या आयुर्वेदात नेमकं काय लिहिलंय


