Share

Sanjay Raut । “माझी अटक राजकीय होती आणि…”; राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर

Published On: 

Sanjay Raut ।  मुंबई : पत्राचाळ (Patrachawl Scam) घोटाळ्या प्रकरणी तब्बल १०२ दिवस अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा अखेर जामीन झाला आहे. मोठ्या जल्लोषात संजय राऊतांचा जामीन साजरा करण्यात आला होता. यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी”, अशी बोचरी टीका केली होती. त्याला आज संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, “मनसे प्रमुख आणि माझे मित्र राज ठाकरे यांनी एका ठिकाणी बोलताना माझ्यावर टीका केली होती. संजय राऊतांवर आता ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्यांनी आता एकांतात बोलण्याची सवय लावून घ्यावी, असे ते म्हणाले होते. मात्र, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, की मी कारागृहात एकांतात होतो. वीर सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते. लोकमान्य टिळक तसेच आणीबाणीच्या काळात अनेक नेते एकांतात होते.”

पुढे ते म्हणाले, “माझी अटक ही राजकीय होती आणि मी माझा एकांतातला काळ सत्कर्मी लावला आहे”, असं सांगत संजय राऊतांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यावर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात का? हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!