Gujrat Election | गांधीनगर : भाजप नेते भूपेंद्र यादव आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 84 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यावेळच्या निवडणूकीत मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. याठिकाणी भाजप (BJP) पक्षाकडून भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची पत्नी रिवाबा जडेजा (Riwaba Jadeja) यांना निवडणूकीसाठी (Gujrat Election) तिकीट देण्यात आलं आहे.
यंदा गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्य मतदान होणार आहे. पहिला टप्पा 1 आणि दुसरा टप्पा 5 डिसेंबर असणार आहे. तर मतमोजणीही 8 डिसेंबरला होणार आहे. यातच आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 84 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. रिवाबा जडेजा यांना जामनगर उत्तर या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
गुरुवारी आगामी गुजरात निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मोरबीचे माजी आमदार कांतीलाल अमृत्या ज्यांनी पूल कोसळल्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली होती, त्यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केलीये.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut । “माझी अटक राजकीय होती आणि…”; राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर
- IND vs ENG T20 WC | अॅडलेडवर टॉस ठरणार निर्णायक! इतिहास काय सांगतो?
- Sanjay Raut | शहा अन् मोदींची भेट घेणार असल्याचं सांगत संजय राऊतांनी केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
- T20 World Cup | टी 20 वर्ल्ड कपमध्ये तीनदा आमने-सामने आले आहे भारत-इंग्लंड
- Anand Dave | “औरंंगजेब, अफजलखानाच्या कबरी नेस्तनाबूत करा नाहीतर…”; हिंदू महासंघाचा राज्य सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

