टीम महाराष्ट्र देशा: देशातील अनेक राज्यांचा पारा ४५ अंशावर जाऊन पोहचला आहे. ही उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसेच देशाच्या काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उष्णतेचा हा वाढता प्रकोप पाहता आरोग्याची काळजी घेणे आणि उष्माघात टाळण्यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशी काही थंड पेय तुम्हाला सांगणार आहोत. जी तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढून तुम्हाला हायड्रेटेड ठेवतील.
नारळ पाणी(शहाळं)– शरीराची उष्णता कमी करण्यासाठी तसेच शरीराचे तापमान कायम राखण्यासाठी नारळ पाणी हे सर्वोत्तम पेय आहे. जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले नारळाचे पाणी शरीराचे तापमान थंड ठेवून शरीराला हायड्रेटेड ठेवते.
पुदिन्याचे सरबत– पुदिन्यात शरीराचे तापमान थंड राखण्याचे गुणधर्म आहेत. पुदिन्याचा सरबत बनवण्यासाठी पुदिन्याची पाने, काळी मिरी, भाजलेलं जिरं, काळं मीठ आणि लिंबाचा रस हे सर्व एकत्र करून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करा. त्यानंतर १ ग्लास थंड पाण्यात १ चमचा पुदिन्याची पेस्ट टाकून सर्व्ह करा. सरबताबरोबरच तुम्ही पुदिन्याच्या चटणीचाही आहारात समावेश करू शकता.
लिंबू पाणी/ सरबत– उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठीचा सर्वात सोपा उपाय म्हणजे लिंबू पाण्याचे सेवन. यात व्हिटॅमिन सी असल्याने शरीर हायड्रेट राहते. ज्यांना खूप घाम येतो त्यांनी याचे सेवन हमखास करायला हवे.
टरबूज/ कलिंगडाचा ज्यूस– उन्हाळ्यात रसाळ, पाणीदार फळे खायला हवीत. प्रामुख्याने टरबूज आणि कलिंगड यांचे सेवन शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवतात. याचा ज्यूस बनवण्यासाठी टरबूज/कलिंगड कापून त्याच्या बिया काढून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्या. यात पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, काळं मीठ आणि भाजलेले जिरं घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. ५ मिनिटात तयार होणार हा ज्यूस तुम्हाला बराच वेळ हायड्रेटेड ठेवेल.
कैरीचं पन्हं- कैरीचं पन्हं हे उन्हाळ्यात बनणार खास पेय आहे जे शरीराला थंड ठेवते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे पचनक्रिया चांगली ठेवून शरीराला हायड्रेटेड ठेवते. याचे सेवन केल्याने उष्माघात होण्याची शक्यताही कमी होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

