पुणे : वसंत मोरे यांनी काल कात्रजमध्ये हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली होती. या आरतीला राज ठाकरे येणार आहेत अशी दाट शक्यता वर्तविली जात होती. पण पूर्वनियोजित कामामुळे राज ठाकरेंना महाआरतीला येता आलं नाही. महाआरतीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडल्यानंतर आज वसंत मोरेंनी राज ठाकरे यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली.
सकाळी वसंत मोरे यांनी ‘राजमहल’ या राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. भेटीत दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. कालच्या महाआरतीला पुण्यातील विविध नेत्यांना निमंत्रण देऊनही काही जणांनी दांडी मारली. त्यांच्याबद्दल बोलताना ‘अतृप्त आत्मे’ म्हणत वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली. तसेच याविषयीची सविस्तर माहिती वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्याही कानावर घातली.
“कालपर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींबाबत माझी राजसाहेबांशी चर्चा झाली. काल कात्रजमध्ये झालेल्या महाआरतीचं राजसाहेबांनी कौतुक केलं. त्यांना महाआरतीला काल येता आलं नाही. पण वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येतो, असं त्यांनी मला सांगितलं. साहेबांना आणखी एका कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे. त्या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करु”, असे वसंत मोरे राज ठाकरेंना भेटून बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

