Share

Sanjay Raut: …मग बघू कोणाकडे किती लोकं आहेत – संजय राऊत

Published On: 

मुंबई – कालपासासून राज्यातील राजकारण चांगलाच तापलेलं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चर्चा कालपासून राज्यासह देशभर सुरु आहेत.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार ( sanjay raut ) संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार स्वगृही परत येतील असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

समज आणि गैरसमज दुर हेतील, ते सध्या आमच्यापासून दूर आहेत जवळ आल्यावर आम्ही चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यपाल साहेबांना कोरोना झालाय त्यामुळे त्यांना बरे होऊ द्या मग बघु कोणाकडे किती लोक आहेत असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोप नाही, असंही ते म्हणाले.

शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल आणि सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी यावेळी दिले. आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होईल अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!