मुंबई : काल (२१ जून) सकाळपासून सुरू असलेला राजकीय भूकंप आता निर्णायक वळणावर पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. आज दिवसभर हा गोंधळ सुरूच राहणार आहे. जवळपास सर्वच पक्ष आपापल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले आहेत. मुंबईतील शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीला रवाना झाल्याची बातमी समोर येत आहे. आज १० वाजता काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली आहे.
महाराष्ट्र सरकारचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले आहे. मंगळवारी संध्याकाळीच परिस्थिती पाहून पक्षाने आपले जुने आणि विश्वासू नेते कमलनाथ यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे आणि आता त्यांच्याकडे कॉंग्रेसची जबाबदारी आहे. मंगळवारी (२१ जून) रोजी रात्रीच ते मुंबईत पोहोचले असून आज सकाळी १० वाजता त्यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. यानंतर कमलनाथ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.
पवारांची राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक –
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. शरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. आमचे सरकार पाडण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचे पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या –


