Share

Sachin Sawant : ‘त्या’ प्रश्नावर संघाची जी अवस्था होते ती आपली होता कामा नये; सचिन सावंत यांचे सूचक ट्वीट

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणावर संपूर्ण देशाची नजर लागली आहे. शिवसेनेशी बंड पुकारत शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमदारांसह गुवाहाटीला मुक्काम ठोकून आहेत. सेनेचे अनेक आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनाचे वारे वाहताना दिसून येत आहे. भाजपसोबत सत्तास्थापन करण्याच्या विचारात एकनाथ शिंदे असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवरच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सूचक ट्वीट केले आहे.

“इतिहास लढणाऱ्यांचा असतो. देशात हुकुमशाही सुरू असताना, संपूर्ण लोकशाही व्यवस्था उध्वस्त केली जात असताना याविरोधात कोण लढला? या प्रश्नाचा मागोवा भविष्यातील पिढ्या निश्चितच घेतील. स्वातंत्र्य काळात कुठे होतात? या प्रश्नावर संघाची जी अवस्था होते ती आपली होता कामा नये.”, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.

दरम्यान या सर्व घडामोडीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या बैठका सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “जास्तीत जास्त काय होणार, सत्ता जाणार पण पक्षाची प्रतिष्ठा महत्त्वाची” असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी होण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!