Share

Sanjay Raut : “तेरा घमंड तो चार दिन का है पगले…” ; संजय राऊतांच्या घरासमोर बॅनरबाजी, शिंदेंवर निशाणा

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांची अट मान्य न केल्यास शिंदे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबईत संजय राऊत यांच्या घरासमोर बॅनरबाजी दिसून येत आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घराबाहेर बॅनर लावण्यात आले असून, त्यात एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. तेरा घमंड तो चार दिन का है पगले हमारी बादशाही तो खानदानी है,’ असे बॅनरवर लिहिले आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवारी पहाटे चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे पोहोचले. महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सुरतहून गुवाहाटी गाठल्यानंतर आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. मात्र, महाराष्ट्राचे ४१ बंडखोर आमदार गुवाहाटीला पोहोचले असून एका आलिशान हॉटेलमध्ये थांबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यापैकी ३४ शिवसेनेचे तर सात अपक्ष आमदार आहेत.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी पक्षाविरोधात बंड करून सुरतमधील हॉटेल गाठल्यानंतर मंगळवारी पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवले. पक्षाच्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आमदारांचे अपहरण होण्याच्या भीतीने हे कृत्य करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!