मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरून हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या स्टाईलमुळे तो अनेक लोकांच्या मनावर राज्य करत आहे. वरूनचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. सध्या वरून ‘जुग जुग जियो’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरून आणि कियारा दोघे पुण्यात गेले होते. यावेळी महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व आहे असे वरूनने विधान केले होते. सध्या हे विधान चर्चेत आहे.
वरून आणि कियारा पुण्यातील सिजन मॉल या ठिकाणी पोहचले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना वरून म्हणाला की, “मी महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान आहे”. माझ्या वडिलांचे शिक्षण पुण्यातूनच पूर्ण झाले. त्याचबरोबर ‘बदलापूर’ या माझ्या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यामध्येच झाले होते. यामुळे मला पुण्याविषयी आपुलकी आहे.
पुढे तो म्हणाला, “मला मराठी चित्रपट पाहायला आवडतात. त्यामुळे मी खूप आवडीने मराठी चित्रपट पाहतो”. दरम्यान जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा अडवाणी, अनिल कपूर, नितु कपूर, प्राजक्ता कोळी, हे सर्वजण मुख्यभूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

