Share

गानसम्राज्ञी लता मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी १०० कोटी जाहीर; ठाकरे सरकारची घोषणा

Published On: 

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या गानसम्राज्ञी लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी ठाकरे सरकारने भलीमोठी रक्कम जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवार ११ मार्च रोजी विधीमंडळात मांडण्यात आला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी लता मंगेशकर संगीत विद्यापीठ उभारण्यासाठी सरकार १०० कोटी रुपये देत असल्याची घोषणा केली आहे .

ठाकरे सरकारच्या या घोषणेमुळे संगीत प्रेमी आणि लता मंगेशकर यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. तसेच संगीत विद्यापीठ उभारुन लता मंगेशकर यांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्याचा शब्द महाविकास आघाडीकडून पूर्ण केला जाणार असल्याचे संकेतही सरकाने दिले आहेत.

लता मंगेशकर यांचे अंतिमसंस्कार ज्या ठिकाणी करण्यात आले, त्या शिवाजी पार्क मैदानात लतादिदींचे स्मारक तयार करण्यात यावे, या मुद्द्यावरुन दोन गट पडले होते. त्यावर अनेक राजकीय व्यक्तींनी त्यांच्या स्वप्नांतील संगीत विद्यापीठ उभारुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, तेच स्मारक ठरेल असा विचार मांडला होता. त्यामुळे अजित पवार यांनी लता मंगेशकर विद्यालयासाठी शंभर कोटींची तरतूद करुन संगीतप्रेमींना दिलासा दिला आहे

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!