मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही काहीना काही कारणावरून सारखी चर्चेत असते. ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. समांथा ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती. पण सध्या समांथा एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमुळे समांथा ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.
समांथाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. समांथाचा हा व्हिडीओ एका अवॉर्ड फंक्शनमधला आहे. या व्हिडीओत समांथाने हिरव्या आणि काळ्या रंगाचा डीप नेक ड्रेस परिधान केला होता. अनेकांना समांथाचा हा लूक आवडला आहे. तर काही नेटकऱ्यांनी समांथाला ट्रोल केले आहे
https://www.instagram.com/reel/Ca7Z86ZKvCH/?utm_medium=copy_link
समांथाला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, “जे कपडे वरती परिधान करायला हवे होते तर ते खाली झाडू लावतं आहेत.” दुसरा नेटकरी म्हणाला, “असं वाटतं की घरातून घाई घाईत निघण्याच्या चक्करमध्ये बेडरूमची चादर गुंडाळून आली.” तिसरा नेटकरी म्हणाला, “माझ्या घरच परदा मिळाला”, अशा अनेक कमेंट करत समांथाला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
महत्वाच्या बातम्या :


