मुंबई: वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला. शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना आर्थिक दिलासा मिळेल, अशा घोषणा आज विधिमंडळात केल्या गेल्या. बजेट मांडताना अजित पवारांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार म्हणाले,
निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई
दिला शब्द राज्याला की, धैर्याने जिंकू लढाई
लढाई लढताना विजयाची जागवली आशा
देशाने पाहिले अवघ्या आम्ही योग्य दाखवली दिशा
असे बोलत कामाची दिशा दाखवली. तसेच अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करण्याआधी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून 250 कोटींचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री अजित पवारांनी केली.
महत्वाच्या बातम्या –


