मुंबई: आजचा दिवस भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगचा सर्वात खास दिवस आहे. २१ वर्षांपूर्वी या दिग्गज फिरकीपटूने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवले आणि भारताला शानदार विजय मिळवून दिला होता. या दिवशी, हरभजन कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला. ज्या दरम्यान त्याने रिकी पॉन्टिंग, अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न अशा दिग्गजांना आपल्या जाळ्यात अडकवले. या कसोटीनंतर भज्जीचे आयुष्यच बदलून गेले. त्याच्यासाठी हा सामना टर्निंग पॉईंट ठरला.
काय घडले होते?
२००१ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिली कसोटी १० गडी राखून जिंकली होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील हा सामना हरल्यानंतर टीम इंडिया कोलकात्याला रवाना झाली. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दुसरी कसोटी खेळवली जाणार होती. अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या (anil kumble) दुखापतीमुळे हरभजन सिंग (Harbhajan singh) फिरकी विभागाचे नेतृत्व करत होता. ज्यात भज्जीने मिळालेल्या संधीचे सोने केले.
https://twitter.com/NorthStandGang/status/1502144369625018372?s=20&t=Nju1P_SJpu0GVE1uPE7bMg
दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर मायकेल स्लेटर आणि मॅथ्यू हेडन यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर जस्टिन लँगरने येऊन अर्धशतक झळकावले आणि भारताच्या अडचणीत वाढ होत होती. सामन्यात कांगारू संघाची धावसंख्या चार विकेट्सवर २५२ धावांवर होती. त्यावेळी स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग फलंदाजी करत होते आणि पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा अॅडम गिलख्रिस्ट अजून यायचा होता. त्यावेळी भारतीय संघ बॅकफूटवर होता, मात्र त्यानंतर हरभजन सिंगने सलग तीन चेंडूत तीन विकेट घेत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.
आधी त्याने रिकी पाँटिंगला एलबीडब्ल्यू आऊट करून आपल्या फिरकीत अडकवले, त्यानंतर त्याने अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्नला आपला शिकार बनवले. ऑस्ट्रेलियाचा स्कोर २५२ वर ४ वरून २५२ वर ७ झाला. यासह भज्जी कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. टीम इंडियाने हा सामना १७१ धावांनी जिंकून मालिकेत बरोबरी साधली आणि तिसऱ्या कसोटीत कांगारूंचा २ गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाची १६ सामन्यांची विजयी घोडदौड थांबवली.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य’ – अजित पवार
- Women’s WC 2022: पाकिस्तान संघाने केली पराभवाची हॅट्ट्रिक; आता टॉप ४ मध्ये एंट्री अवघड
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज होणार माफ!
- सहा बोटं असलेल्यांचाही घसा सुकतोय’ भर कार्यक्रमात कंगणाने लगावला हृतिकला टोला
- ‘राज्याच्या विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

