मुंबई: आयसीसी महिला विश्वचषकात पाकिस्तान संघाचा त्रास संपण्याचे नाव घेत नाहीये. संघाला एकापाठोपाठ एक पराभवाचा सामना करावा लागत आहे. आज दक्षिण आफ्रिकेशी पाकिस्तानची तिसऱ्या सामन्यात लढत झाली. या दोघांमध्ये रंगलेल्या या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली, तर पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
खरे तर या सामन्यात पाकिस्तान संघाला अवघ्या ६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तानचा स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेपूर्वी पाकला भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. यापूर्वी त्यांनी बांगलादेशचा ३२ धावांनी पराभव केला होता. स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवानंतर आता पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पाकिस्तान संघासमोर विजयासाठी २२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ अवघ्या २१७ धावांत ऑलआऊट झाला आणि त्यांना अवघ्या ६ धावांनी सामना गमावावा लागला. शेवटच्या षटकात १० धावा आवश्यक असताना पाकच्या २ विकेट शिल्लक होत्या. मात्र पाकची ९ वी विकेट पडली. यानंतर पाकिस्तान संघाला विजयासाठी ३ चेंडूत ७ धावांची गरज होती, जी सहज करता आली असती. पण, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचे इरादे थोडे वेगळे होते. तिने चौथ्या चेंडूवर डॉट टाकला आणि पाचव्या चेंडूवर पाकिस्तानला अंतिम धक्का दिला.
महत्वाच्या बातम्या
- सहा बोटं असलेल्यांचाही घसा सुकतोय’ भर कार्यक्रमात कंगणाने लगावला हृतिकला टोला
- ‘राज्याच्या विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- “पंतप्रधानांनी जरी चुकी केली असेल तर…”, गणपत गायकवाड यांचे मोठे वक्तव्य
- “पीच बनवणे भारताकडून शिका” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा पीसीबीला सल्ला
- “देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात”, गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

