मुंबई: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला असल्याची माहिती आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज अपूर्ण राहिली आहे. आज मंगळवारी रमजान ईदमुळे न्यायालयाला सुट्टी असल्याने बुधवारी म्हणजे 4 मे ला त्यावर निकाल लागणार आहे.
राणा दांपत्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. मागील आठवड्यात शनिवारी युक्तीवाद पुर्ण झाला होता. पण कामकाजाची वेळ संपल्याने न्यायालयाने आज म्हणजेच २ मे वेळ दिली होती. पण आजही न्यायालयीन सुट्टी असल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आला. आता यावर 4 मे ला निकाल लागणार आहे.
राणा दाम्पत्यावर १२४ अ नुसार राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. आज सोमवारी निकाल लागणार होता. राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी विविध मुद्द्यांवर पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राणा दाम्पत्याकडून जामिनासाठी अर्ज केला गेला होता पण न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता. आता जामिनावर सुनावणी पूर्ण झाली असली तरी निकाल आज २ मे ला लागणार होता. पण आता हा निकाल 4 मे वर ढकलला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

