🕒 1 min read
मुंबई : राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार येताच मेट्रो 3 कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत ‘आरे वाचवा’ या चळवळीतील सदस्यांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि आरेवासीयांनी शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. मात्र आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आलेल्या मुंबईच्या आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडून आरे कारशेडवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचे २५ टक्के कामही पूर्ण झाले होते. मात्र, नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता.
मात्र, राज्यात युतीचं सरकारने पुन्हा स्थगिती उठवली. गेल्या तीन वर्षापासून आरे प्रकल्प लांबणीवर पडला होता. ईगोचा इशू मविआ करत आहे असा आरोप भाजप करत होते. त्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे. मात्र येत्या दोन वर्षात हा प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे महायुती सरकारनं सांगितलं. मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा असा प्रयत्न जरी होत असला तरी काही संघटना आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Shiv Sena | शिवसेनेच्या अखंडतेसाठी प्रती दादा कोंडके ‘उत्तम शिंदें’ची पायी वारी
- Aaditya Thackeray : थोडी जरी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या – आदित्य ठाकरे
- Nana Patole : महाविकास आघाडीने OBC आरक्षणासाठी प्रयत्न केला, त्याचं हे यश आहे – नाना पटोले
- Shivaji Adahrao Patil : पुढील 15 दिवसात अख्खी शिवसेना आमच्यासोबत येणार; आढळराव पाटलांचं सर्वात मोठं विधान
- Riteish Deshmukh | वडील मुख्यमंत्री असताना मी सेक्स कॉमेडीमध्ये काम केलं- रितेश देशमुख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
