Share

‘महाविकास आघाडी सत्तेसाठी नाही तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी’; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे

Published On: 

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझा डॉक्टर’ परिषदेमध्ये बोलताना विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली होती. ‘अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको’, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

समोरच्यांना बोलण्या ऐवजी आपल्या सोबतच्यांना, आपल्या पक्षातील लोकांना पहिल्यांदा शिकवावं, समजवावं आणि मग आम्हाला सांगावं, असा टोला यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

महाविकास आघाडी ही सत्तेसाठी झाली नसून सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण सरदार असल्यासारखा वागतोय. प्रत्येक जण जेवढे लचके तोडता येतील तेवढे तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि लचके तोडायला मिळाले नाही तर एकमेकांचे लचके तोडा, अशी अवस्था या महाविकास आघाडीची झाली आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!