Share

अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढणार; ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता

Published On: 

मुंबई – शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर हा संघर्ष आणखी पेटणार अशी शक्यता वर्तविली जात असताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या धडक कारवाईमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना नुकताच सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशीचा समन्स बजावला होता. त्यासाठी मागील आठवड्यात ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, अनिल परब  ईडीसमोर उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी याबाबतचं कारण ईडी कार्यालयाला पत्राद्वारे कळवलं आहे. त्याचबरोबर हजर राहण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागितला आहे. अनिल परब यांनी वकिलांच्या माध्यमातून ईडीला पत्र पाठवलं आहे.

दरम्यान, आता अनिल परब यांना ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता आहे. याआठवड्यात त्यांना ईडी पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल परबविरोधी ईडीकडे तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. यामुळे एकंदरीतच परब यांच्या अडचणी चांगल्याच वाढताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!