इंग्लंड : ओव्हल येथे भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिल्या डावात खराब कामगिरी केल्यानंतर सलामीच्या फलंदाजांमुळे भारतीय संघाने मजबूत स्थिती बनवली असून आजच्या दिवशी देखील भारताचा डाव सुरु असून धावसंख्येचा वाढ होत आहे. या कसोटी मालिकेत कर्णधार विराट कोहलीसह रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, के एल राहुल यांना चांगली कामगिरी करता आली असली तरी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने मात्र पुन्हा एकदा निराशा केली आहे.
मागील कसोटी सामन्यांमध्ये रहाणेने खराब कामगिरी केल्यानंतर या डावामध्ये तरी त्याला चांगली कामगिरी करता येईल अशी आशा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली होती. मात्र रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे केवळ ८ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. क्रिस वोक्सने त्याला पायचित केले. LBW निर्णयावर अजिंक्य रहाणे नॉन स्ट्राइकला असलेल्या विराट कोहलीसोबत रिव्ह्यू संदर्भात चर्चा करताना दिसले. पण विराटने क्लियर आउट असल्याचे सांगत रिव्ह्यू घेण्याची रिस्क घेतली नाही. यानंतर नेटकाऱ्यानी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.
https://twitter.com/hehehihi619/status/1434473363754283008?s=20
गेल्या काही सामन्यात इंग्लंडमधील जारवो नावाचा चाहता वांरवार मैदानात खेळायला येताना दिसतोय. भारताकडून कधी फलंदाजी करण्यासाठी तर कधी गोलंदाजी करण्यासाठी हा चाहता जर्सी घालून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. सुरक्षा रक्षकाकडून त्याला बाहेर काढतानाचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच फोटोच्या माध्यमातून काहीजण रहाणेला ट्रोल करत आहेत. जारवोप्रमाणे आता अंजिक्य रहाणेला ओढून बाहेर काढण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
Left: What Rahane promises.
Right: What Rahane delivers. #ENGvsIND #ENGvIND pic.twitter.com/cxv8fT5NDE— R I S H A B H (@BeingRishabhT) September 5, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- जीव धोक्यात घालायचा असेल तर पहिला नंबर माझा असेल; राजू शेट्टींचा एल्गार
- ‘इन्फोसिसचे देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान’; ‘त्या’ वादग्रस्त स्टोरीनंतर संघाचे स्पष्टीकरण
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- ‘महापौरांना नक्की कोणाला इज्जत द्यायची होती अन् कोणाची काढायची होती’; निलेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली
- ‘गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले’; संजय राऊतांनी व्यक्त केली जाहीर नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

