पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळून देखील ऐनवेळी शिवसेनेने साथ सोडल्याने भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं असून सेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. कोरोना, भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांच्या बदल्या, चक्रीवादळग्रस्त-पूरग्रस्त यांना मदत अशा विविध मुद्द्यांवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला असून काही मंत्र्यांवर गंभीर आरोप देखील केले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय वर्तुळामधील वातावरणाबाबत भाष्य केलं आहे. मंचर येथे दिवंगत किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम पवार यांच्या हस्ते पार पडला. यानंतर बोलताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने आज संघर्ष दिसत आहे. एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय. मग वक्तव्य मागे घ्यावे लागतायेत त्यांच्यावर दिलगिरी ही व्यक्त करण्याची वेळ येते. महाराष्ट्रातील ही आजची परिस्थिती आहे. किसनराव बाणखेले विरोधात असताना देखील जे वागायचे, त्याची कमतरता दिसते.’
आमच्या काळात शेतमाल फेकून देण्याची वेळ येऊ दिली नाही
‘आमच्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खाली येऊ दिले नाही. सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागत आहे’,असं सांगत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जीव धोक्यात घालायचा असेल तर पहिला नंबर माझा असेल; राजू शेट्टींचा एल्गार
- ‘इन्फोसिसचे देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान’; ‘त्या’ वादग्रस्त स्टोरीनंतर संघाचे स्पष्टीकरण
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- ‘गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले’; संजय राऊतांनी व्यक्त केली जाहीर नाराजी


