Share

ब्राह्मण हे विदेशी आहेत, असं वक्तव्य केल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

 रायपूर –  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्या विरोधात राजधानी रायपूरमध्ये एक FIR दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांना ‘उपरे’ (बाहेरचे) म्हटलं होतं. बघेल यांच्या वक्तव्यावर ब्राह्मण समुदायानं आक्षेप घेत रायपूरच्या डीडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवरच गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी अलीकडेच ब्राह्मण हे परकीय असल्याचे सांगून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन लोकांना केले, तसेच ब्राह्मणांना आपल्या खेडय़ात प्रवेश करू देऊ नका असेही सांगितले.

ज्याला मत, त्याचे सरकार. ब्राह्मण विदेशी आहेत. ज्या प्रकारे इंग्रज भारतात आले होते, तसेच ब्राह्मणही इथून जातील. ब्राह्मणांनी सुधरावं अन्यथा इथून जाण्यासाठी तयार रहावं. ब्राह्मण विदेशी असल्याने त्यांच्याविरोधात नाराजी आहे. ते आपले अधिकार हिसकावून घेतात. गावा-गावांमध्ये जावून ब्राह्मणांविरोधात बहिष्कार करू, असं नंदकुमार बघेल म्हणाले होते.

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी भगवान श्रीरामाविरुद्ध कथितरीत्या अपमानास्पद शेरेबाजी केली होती, असे तक्रारीत म्हटल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. उत्तर प्रदेशात एका कार्यक्रमात भाषण करताना नंदकुमार बघेल यांनी ही शेरेबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!