मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती. यावरूनच सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना आव्हान देत मोठे वक्तव्य केले आहे.
“अमित ठाकरे यांना स्वतः वैयक्तिक आमंत्रण दिले नव्हते की, तुम्ही येऊन हनुमान चालिसा म्हणा. मेटाफर किंवा पोएट्री आपण म्हणू शकतो. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की आपण आतापर्यंत किती दंगली बघितल्या, बाबरी मशिद असो किंवा भीमा कोरेगाव असो, दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात. त्यांच्या वक्तव्यावरुन प्रभावित होऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणारे हे बहुजन असतात. माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल, तर बहुजन मुलांच्या अगोदर स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा आणि तुम्ही स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका.”, असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान आज (१२ एप्रिल) ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर सभा होणार आहे. यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील पाडवा मेळाव्यात त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती. त्यावरून मविआ नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत संपलेला पक्ष म्हणून डिवचले होते. तर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनीही नाराजी जाहीर केली होती. आज विरोधकांच्या टीकेला राज ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“एकत्र येऊन शरद पवारांच्या पाठीशी उभं राहावं लागेल”, अमोल मिटकरींचे आवाहन
“दंगल पेटवायचीच असेल तर अगोदर स्वतःच्या मुलाला…”, सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना खुले आव्हान
“मद्यधुंद अवस्थेतील काही लोक…”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अमोल मिटकरींचे मोठे वक्तव्य
“कुमार आदित्यजी ठाकरे आम्ही राजसाहेबांचे…”, ‘मनसे’चा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

