Share

“मद्यधुंद अवस्थेतील काही लोक…”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अमोल मिटकरींचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. असे असतांनाच काल (११ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विदर्भात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी बोलत असतांना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी भाष्य केले.

यावेळी बोलत असतांना अमोल मिटकरी म्हणाले की,‘मद्यधुंद अवस्थेतील काही लोक आपले श्रद्धास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर सोडले गेले.’ तसेच निष्पाप लोक होते त्यांना आत टाकले आणि जे खोटे आहेत ते सरकारविरोधात, शरद पवारांविरोधात सातत्याने बोलत असतात. ज्या वकिलांनी कोर्टात वकिली केली पाहिजे ते वकील तिथे वकिली करु लागले, असेही मिटकरी म्हणाले.

दरम्यान, या शक्तीप्रदर्शनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह एकनाथ खडसे, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अमोल मिटकरी आदी मंचावर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!