Share

“एकत्र येऊन शरद पवारांच्या पाठीशी उभं राहावं लागेल”, अमोल मिटकरींचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : काल (११ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विदर्भात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी बोलत असतांना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच एकत्र येऊन शरद पवारांच्या पाठीशी उभं राहावं लागेल, असे आवाहनही यावेळी मिटकरींनी केले.

यावेळी बोलत असतांना अमोल मिटकरी म्हणाले की,‘विरोधक खोटं बिंबवण्याचा प्रयत्न करत असून एखादी गोष्ट १०० वेळ सांगितली की खरी वाटू लागते असं सूडाचं षडयंत्र भाजपचं सुरु आहे. एकत्र येऊन शरद पवारांच्या पाठीशी उभं राहावं लागेल.’ तसेच विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठी संधी असून त्यासाठी काम करायला हवं, असेही मिटकरी यावेळी म्हणाले.

दरम्यान, पुढे सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बोलत असतांना मिटकरी म्हणाले की,‘मद्यधुंद अवस्थेतील काही लोक आपले श्रद्धास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर सोडले गेले.’ तसेच निष्पाप लोक होते त्यांना आत टाकले आणि जे खोटे आहेत ते सरकारविरोधात, शरद पवारांविरोधात सातत्याने बोलत असतात. ज्या वकिलांनी कोर्टात वकिली केली पाहिजे ते वकील तिथे वकिली करु लागले, असेही मिटकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!