🕒 1 min read
मुंबई : जगातील सगळ्यात जुना ७५ वा कान्स चित्रपट महोत्सव सुरु आहे. या महोत्सवासाठी अनेक प्रसिद्ध कलाकारांनी कान्समध्ये हजेरी लावली. महोत्सवाच्या 75 व्या आवृत्तीच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या अदाकारी सादर करत सर्वांना थक्क केले. त्यालाच पाठींबा देण्यासाठी प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हर पॅरिस मध्ये पोहचला असल्याची बातमी समोर येत आहे. सुनीलने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली ज्याने सर्वांना धक्का बसला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.
‘द कपिल शर्मा शोचा’ प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा त्याच्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सुनिलने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आह ज्यामध्ये तो कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर गुत्थीच्या भूमिकेत फिरताना दिसत आहे. पण हा फोटोशॉप करण्यात आलेला मॉर्फ फोटो आहे. या फोटोमध्ये तो पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये आहे. फोटो शेअर करत सुनीलने लिहले, “फ्रेंच रिव्हिएरा” त्याच्या या फोटोवर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत.
चाहत्यांसोबात इंडस्ट्रीमधील लोक सुद्धा सुनील च्या खास फोटोवर कमेंट करत आहेत. चित्रपट महोत्सवामधील सुनीलचा लुक पाहून हिनाला खानला देखील हसू आले. हिनासोबत रोनित रॉयनेही कमेंट केली तो म्हणाला, “वाओ, यार तुमने तो मार ही डाला” अशी कमेंट केली. सुनील ग्रोव्हरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो चित्रपट आणि वेबसिरजकडे जास्त लक्ष देत आहे. सध्या तो वेबसिरजच्या शुटींग मध्ये व्यस्त आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
