मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरुन राज्याच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagtSigh Koshyari) यांनी आवाजी मतदान विरोध केला. राज्यपालांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना पत्र लिहले होते. मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या पत्रावर राज्यपाल चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
या निवडणुकीवरून राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धाडलेल्या पत्रातील भाषेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आक्षेप घेतला आहे. ‘पत्र वाचून मी व्यथित झालोय, निराश झालो आहे. माझ्यावर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव आणू शकत नाही. हे योग्य नाही. तुमच्याकडे असे अधिकार नाहीत. मी घटनेच्या चौकटीत राहून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बांधील आहे. मला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो योग्य असला पाहिजे. सर्व बाबींचा विचार करुन मला निर्णय घ्यावा लागतो. यासाठी तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही’, असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले आहेत.
राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
तुमच्या पत्रात तुम्ही संविधानाच्या अनुच्छेद 208 नुसार नियम तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण तुम्ही अर्धवट माहिती देत आहात. त्याच अनुच्छेदात म्हटलं आहे की, जो काही विधीमंडळाचा निर्णय घेतला जाईल. तो संविधानिक असला पाहिजे. संविधानिक प्रक्रिया पार पाडूनच त्याची कार्यपद्धती असली पाहिजे.
संविधानाच्या कलम 159 नुसार राज्य घटनेचं संरक्षण, संवर्धन आणि बचाव करण्याची मी शपथ घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भातील नियमात करण्यात आलेले बदल हे प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्यानं त्याला सद्यस्थितीत मंजुरी देता येणार नाही.
आपण सभापती निवडीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी 11 महिने घेतले आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेच्या नियम 6 आणि 7 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. या सर्वांचा प्रभाव आणि दुरुस्त्यांचे कायदेशीर परीक्षण करणे आवश्यक आहे. मी आतापर्यंत सभागृहाची कार्यपद्धती/ प्रक्रियेसंदर्भात कधीही प्रश्न विचारला नाही.

तथापि, संविधानाच्या कलम 208 मध्ये नमूद केल्यानुसार, प्रथमदर्शनी असंवैधानिक आणि बेकायदेशीर वाटणाऱ्या या प्रक्रियेला संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही. तुमच्या पत्राचा असंयमी टोन आणि धमकावणारा सूर पाहुण मी वैयक्तिकरीत्या खूप दु:खी झालो आहे. ते पत्र संविधानचं सर्वोच्च ऑफिस असलेल्या राज्यपालाचा अपमान आणि बदनामी करणारं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराच्या दृष्टीने विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले’, भाजपचा आरोप
- ‘कुणावर हल्ला घडवून आणण्याची वृत्ती वाळव्याच्या पाटलांची नाही’, राऊतांकडून जयंत पाटलांची पाठराखण
- “भाजप पुढाऱ्यांच्या डोक्याचा केमिकल लोचा”, संजय राऊतांची खोचक टीका
- “विरोधी पक्ष मांजरीचा वंशज असल्याने…” ; शिवसेनेची खोचक टीका
- ‘श्रीधर नाईकापासून, रमेश गोवेकरांपर्यंत ज्या हत्या झाल्या त्याच मालिकेत संतोष परबांनाही बसवायचे होते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

